कोरोना

 कोरोना ची आलीय साथ

चीन काही सोडत नाही पाठ

घ्या सर्वांनी आपली काळजी 

नाहीतर लागेल आपली वाट


फेब्रुवारी मध्ये झाली सुरुवात

वाटली होती छोटीसी बात

आता होऊन गेले महिने सात

आणि म्हणे ही तर आहे सुरुवात


अपेक्षा होती प्रोमोशन होईल

पण पिंक स्लिप हाती आली

कशीबशी नोकरी टिकली

पण पगारवाढ मात्र खुंटली


सर्वाना आता गावची आठवण झाली

वांद्रालाही खूप गर्दी झाली

म्हणून पाठवला देवाने दूत

नाव त्याचं सोनू सूद


कोरोना आला येऊ देत

माणसं मेली मरू देत

आपण आपलं राजकारण करू

जोडतोड करून सरकार बनवू


सरकारच आपलं बरं आहे

ते म्हणतील तेच खरं आहे

दिवे लावू थाळ्या वाजवू

सध्या तेच आपल्या हातात आहे

मुक्तछंद

तुझ्यावर लिहिणं
हे माझं व्यसन आहे
कारण तुझ्याशिवाय जगणं
मला नापसंत आहे

शब्द आहेत थोडे
यमकही जुळत नाही
तरी कविता थांबत नाही
कारण मुक्तछंद आहे

हल्ली खूप कामात असतो
तरीही थोडी उसंत आहे
आणि तुझ्याबद्दल लिहीणं
हाच तर माझा छंद आहे

तुला भेटायला आलो असतो
कारण week end ला तसा मोकळाच असतो
पण हल्ली कोरोना ची साथ आहे
आणि अख्खी मुंबई बंद आहे